लिहायला बसलो होतो प्रेमावरची कविता एक नाही दोन नाही दहा वेळा उठलो,
अस नाही की काही सुचत नव्हत ; पण गर्लफ्रेंड चा चार चार वेळा फ़ोन येत होता,
"काम करतोय, नंतर बोलू" म्हणायची पंचाईत! सुट्टीवर होतो,
आणि प्रेमावर कविता लिहितोय सांगून secret फोडायची नव्हती,
"हल्ली प्रेमावर बर्या कविता लिहितोयस !" ह्या टोमण्याला आम्ही साळसूदपणे उत्तर दिले
"असच काही नाही मैत्री वगैरेंवरपण लिहितोय.." अन प्रेमरथाचे तारु उधळले
अशा ह्या प्रेमाला सावरण्यात हा एवढा वेळ गेला
पण तरी प्रेमाची महती दोस्तहो सांगतो मी तुम्हाला
काय सांगू मित्रांनो प्रेम काय चीज असते, किंबहुना ;
सांगण्या पलिकडली अशी ती अनुभवायची गोष्ट असते
उशीरा भेटल्यावर करायची मिन्नतवारी असते
अन तिला उशीर झाल्यावर करायची ढीगभर काळजी असते
"काय करतोयस?"चे अचूक, स्मार्ट उत्तर देण्याची भलती ताराम्बळ असते
"Miss you" अन "Love you" ची सुखद झुळूक असते
तर , प्रामाणिक सल्ला आहे मित्रहो प्रेमात एकदा तरी पडून पहा
नाहीतर जा बघायला अनोळखी मुली अन खा पोहे प्या चहा!
किरणसाठी
Good one mitraa :)
ReplyDeletetoo gud re.. got 2 knw other side of u!;)
ReplyDeleteKhupach sundar!
ReplyDelete:) Just a starting attempt.. trying to improve further.. Thanks a lot!
ReplyDeleteMitra Todlas !! Keep smiling!! The photograph is too good!
ReplyDeleteMastach adi... tujhya kadun he unexpected aahe. Pan bhari aahe.....Keep it up.
ReplyDeleteMast ahe,
ReplyDeleteani kiran sathi he mahatwache ahe