Monday, 27 December 2010

Paragliding.. is a MUST DO; again!

आयुष्यात अशा काही वेळा असतात जेव्हा "बाकी सगळं जग गेलं तेल लावत! मी चाललो..." हे implement करणं अगदी बरोबर ठरतं. आज असाच दिवस होता.

Thanks to आदिती मोघे, आजचा दिवस सगळ्या कटकटी विसरायला लावणारा, एक अविस्मरणीय दिवस ठरला. कामशेत जवळ Temple Pilots ह्या group बरोबर आज Paraglidingचा जो जबरदस्त अनुभव घेतला, त्याचेच काही photos:


मी आणि माझा pilot गणपत, ज्याने त्याच्या amazing expertiseच्या जोरावर मला एक जबरदस्त सफर घडवली. Glideचा काही काळ असा होता की वारा पडल्यामुळे आम्ही दरीत फक्त खाली-खाली जात होतो. तेव्हढ्यात काही tranches मधून वर येणार्या वार्याच्या जोरावर आम्ही इतकी काही height मिळवू शकलो की जवळच्या दूरदर्शनच्या मनोर्याला भोज्जा करून परत येता आलं :) (BTW कामशेतच्या घाटाच्या आधीपासून हा मनोरा फार दुरूनही दिसतो) मनोर्यासमोर जाता-जाता समोरून एक जेट विमान गेलं, इतकं की तेव्हा हातात कॅमेरा नसल्यामुळे झालेलं दुख्ख निव्वळ वर्णनातीत आहे. पण तरी एकंदरीत तुफ्फान मजा आली!



ह्या flightच location: पुणे - मुंबई Express wayच्या वर आणि कामशेतच्या बोगद्यापुढील दरीत, जिथे एकीकडे Express way तर दुसरीकडे रेल्वे track आहे :) It was such a splendid sight!



एक सुंदर सूर्यास्त, and an evening to remember :)



माझी glide झाल्यावर एका दीर्घ विलंबानंतर glideचा chance मिळाल्यावर आदितीला झालेला विशेष आनंद इथे जसाच्या तसा catch झालाय. पण हे सगळं arrange केल्याचा पूर्ण श्रेय केवळ तिलाच. एक SUPER-AWESOME experience मिळाला ! :)